Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
आयुर्वेदातील गुगलचा रम्य सहवास

आजोबांच्या पिढीपासून मुंबईत राहात असलेल्या डॉ. कुसुम पांडे यांचे बालपण मुंबईतच गेले. त्यांचे मोठे भाऊ एमबीबीएस डॉक्टर होते. डॉ. कुसुम यांना बारावीनंतर एमबीबीएसला मुंबईबाहेरच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळत असल्याने घरच्यांचा नकार होता. मग त्यांनी मुंबईतच पोद्दार कॉलेजमध्ये बीएएमएसला प्रवेश घेतला. एमबीबीएसला प्रवेश मिळाला नाही, याचे दुःख आणि आयुर्वेदातल्या अत्यंत जड संकल्पनांचे ओझे यातच बीएएमएसचे पहिले वर्ष कसेबसे ढकलले. एमबीबीएसचे आकर्षण काही स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे बीएएमएसच्या पहिल्या वर्षात असतानाही पुन्हा एमबीबीएसला प्रवेशासाठी डॉ. कुसुम यांनी प्रवेश परिक्षा दिली.
अॅनाटॉमी, फिजियालॉजी हे विषय सोडले, तर बाकी सगळे विषय डोक्यावरून जाणारे होते. आयुर्वेदाचा इतिहास, पदार्थविज्ञान, आयुर्वेद हितोपदेश हे सगळे विषय क्लिष्ट आणि कंटाळवाणे होते. त्यात हे सगळे पाठांतर करून पास कसे होणार याची चिंता वाटत होती. त्यातच लघुसिद्धांत कौमुदीसारखे अनेक ग्रंथ संस्कृतमध्ये होते. बारावीपर्यंत पहिली भाषा हिंदी आणि दुसरी भाषा संस्कृतऐवजी मराठी घेतल्यामुळे संस्कृत फार येत नव्हते. त्यातच आयुर्वेदात अनेक ऋषींचा समावेश आहे. धार्मिक असले तरी हे सगळे अभ्यास करून लक्षात ठेवून परीक्षेत लिहायचे, या विचारानेच नैराश्य येत होते. पण अखेरीस पहिल्या वर्षाची परिक्षा डॉ. कुसुम पास झाल्या.
त्यानंतर दुसर्या वर्षापासून आयुर्वेद या विषयाची गोडी लागली. द्रव्यगुणासंबंधी माहिती देताना पोद्दार महाविद्यालयाच्या परिसरातली झाडे-झुडपे दाखवायला घेऊन जात. ते मजेशीर होते. रसशास्त्रही अतिशय रंजक विषय होता. पोद्दार महाविद्यालयात आयुर्वेदात मॉडर्नही शिकवायचे. त्यामुळे त्यात डॉ. कुसुम यांना आणखी रुची येत गेली. इथे डॉ. रेड्डी जळवा लावायचे. इथे महाविद्यालयाच्या क्लिनीकमध्ये खूप चांगला अनुभव आला. कितीही वाईटातल्या वाईट स्थितीतल्या पेशंटवर आयुर्वेदिक ट्रीटमेंट केली जायची. इथे सगळे आयुर्वेदाचे वातावरण होते. कान-नाक-घसा (ईएनटी) डिपार्टमेंट असो की गायनॅक की फिजिओथेरपी या सगळीकडे आयुर्वेदिक उपचार केले जात असत. पेशंटलाही त्यातून आराम मिळत असे. हे पाहताना आयुर्वेदाची ही पद्धत आजच्या काळातही चालू शकते आणि आपणही ती वापरू शकतो याची चांगली जाणीव डॉ. कुसुम यांना झाली. लेप, गुग्गुळे, शिरोधारासारख्या उपचारांचा वापर इथे केला जायचा. याचा पेशंटला चांगला परिणाम मिळायचा.
पदार्थविज्ञान व दर्शनशास्त्र शिकवणार्या वैद्य व्ही. जी. व्यास यांचाही चांगला प्रभाव डॉ. कुसुम यांच्यावर होता. वैद्य हरिश पाटणकर यांना भेटल्यावर कोणत्याही व्याधीवर आपण सहज उपचार करू शकतो हा आत्मविश्वास डॉ. कुसुम यांच्यात निर्माण झाला. त्याआधी आम्ही वात-पित्त-कफ यातच अडकून पडायचो. आधुनिक पद्धतीत आपण  रक्त, लघवी, मलाची तपासणी करतो, तीच चिकित्सा आयुर्वेदात दोष, धातू, मल या रूपात केली जाते. हे सगळे सोप्या पद्धतीने समजल्यामुळे नवा आत्मविश्वास निर्माण झाला. पंचकर्म चिकित्सा केंद्र सुरू करण्याची डॉ. कुसुम यांची खूप इच्छा होती. पण कोणत्या पेशंटवर कोणते कर्म करावे हे माहित नव्हते. पेशंट आणि त्याच्या व्याधीनुसार योग्य कर्म करावे लागते. त्याचीही माहिती पाटणकरांना भेटल्यानंतर मिळाली. धातूच्या स्वरूपात, पंचमहाभूताच्या रूपात चिकित्सा करायलाही त्यांनीच मार्गदर्शन दिले. डॉ. कुसुम या आधी स्त्रीरोगामध्ये प्रॅक्टिस करायच्या. पण तिथे रोज नियम बदलायचे. तपासण्या, औषधे यावर अनेक प्रकारची बंधने होती. पण आज पेशंटला हेच औषध का दिले, असे कोणी विचारले, तर त्यांना ठणकावून वैज्ञानिक पद्धतीने सांगू शकते, असे डॉ. कुसुम सांगतात.
केशायुर्वेद ही एक सुपर स्पेशालिटी आहे. लोक मला विचारतात, तुम्ही एमडी आहात का, तर मी त्यांना सांगते की, एमडीच्या नंतरचा कोर्स मी केला आहे. 48 व्या वर्षात काही नवे करू शकेन, असे वाटले नव्हते. किशोर पांडव आणि गायत्री पांडव यांनी केलेले केशायुर्वेदचे काम पाहिले होते. तरीही आपण करू शकू, असे कधी वाटले नव्हते. पण एक दिवस पाटणकर सरांना भेटायचे ठरवले आणि पुण्याला आले. सरांनी सविस्तर माहिती दिली आणि केशायुर्वेद सेवाशाखा (अधिकृत सेवाकेंद्र) हे तुमच्यावर असल्याचे सांगितले. तेव्हा केशायुर्वेदशी आपल्याला जोडून घेण्याचा निर्णय घेतला.
उत्तरप्रदेशात आयुर्वेदिक वैद्याच्या नावावर अनेकजण स्टेरॉईड्स किंवा अन्य अॅलोपॅथिक औषधांचेच चूर्ण देतात, ही वस्तुस्थिती आहे. फ्रँचायजी घेतल्यावर पहिल्याच दिवशी एक शिबिर घेतले. त्याला चाळीसेक पेशंट आले होते. केसांचेही इतके पेशंट असू शकतात, हे तेव्हा त्याम्ना कळाले. डॉ. कुसुम यांचे ब्युटीपार्लरही आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये शिरोधारा चार-पाच हजार रूपये घेऊन केली जाते. हा आयुर्वेदाचा गैरवापर आहे, असे वाटल्यामुळे कमी पैशात पंचकर्म सुरू करण्याच्या डॉ. कुसुम यांच्या इच्छेला आणखी पाठबळ मिळाले. केशायुर्वेदची फ्रँचायजी घेतल्यापासून लखनऊ, बनारस, दिल्ली इथून बात्राज, रिचफिलसारख्या मोठ्या ब्रँडमधून ट्रीटमेंट घेतलेले पेशंट डॉ. कुसुम यांच्याकडे आले. केशायुर्वेद आणि डॉ. कुसुम यांच्या नावाची शहरभर चर्चा सुरू झाली.
पाटणकर सरांनी इतक्या कमी वयात इतका चांगला विचार करून हे सगळे केले आहे. ते आयुर्वेदाचे ‘गुगल’ आहेत. ते अत्यंत नम्र आहेत, कोणीही त्यांना प्रश्न विचारू शकते. इतक्या उंचीवर गेल्यानंतरही आम्ही फोन केला आणि त्यांना बोलता आले नाही, तर ते परत फोन करतात, असा अनुभवही डॉ. कुसुम सांगतात. एमबीबीएस डॉक्टर असलेले दोन पेशंट विचारतात की, तुमच्या आयुर्वेदात अमुक व्याधीवर काय उपाय आहे. त्यांना डॉ. कुसुम सांगतात, केशायुर्वेद पूर्णपणे शास्त्रशुद्ध डाटाबेसवर आधारीत आहे. आयुर्वेदाची खिल्ली उडवणार्यांना आकडेवारी आणि पुराव्यासह सडेतोड उत्तर देण्याची क्षमता केशायुर्वेद आणि पाटणकर सरांनी निर्माण केली, असेही डॉ. कुसुम सांगतात.
त्यांच्यासारख्या अत्यंत अभ्यासू, तज्ज्ञ आणि तितक्याच मनमिळाऊ व्यक्तीचा हा रम्य आणि विद्वतापूर्ण सहवास, मार्गदर्शन आणि शिष्यत्व मिळाले, हे आपले अहोभाग्य असल्याचे कुसुमना वाटते. या दैवी गिफ्टमुळेच आपल्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडल्याचे डॉ. कुसुम अत्यंत अभिमानाने सांगतात.

Organization Details

नाव : डॉ. कुसुम अजय पांडे
शिक्षण : बीएएमएस
क्लिनिकचे नाव : अम्मा हॉस्पिटल अँड पंचकर्म केंद्र्
पत्ता : जेसीस चौराहा, ता. सदर, जि. जौनपूर, उत्तरप्रदेश  
मोबाईल : 9451296380
ईमेल : [email protected]
कधीपासून प्रॅक्टिसमध्ये : 2016 पासून
केशायुर्वेदशी संलग्नित : 2019 पासून

 

Our Specialities

  • One stop solution for all your hair and skin problem.
  • Accurate diagnosis and perfect treatment.
  • Complete Scalp Analysis, Photography, Microscopic Testing as well as HQ (Hair Quotient) and HP (Hair Prakruti ) analysis.
  • Authentic Ayurvedic treatment from team of expert doctors like Ayurvedacharya’s, Cosmetologist’s, Trichologist’s.
  • Wide range of hair and skin care herbal products.